Uncategorized

बालाजी मापारी तलाठीपदी निवड .

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – तालुक्यातील ग्राम सोमठाणा या ग्रामीण भागातील कष्टातून वर आलेले कुटुंबातील बालाजी माघारी यांची तलाठी पदी नियुक्ती झाली आहे.
कुटुंबाने कष्ट करून संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं पुढे आपल्या मुलाला काहीतरी मोठे करावे असे माजी बसचालक सुभाष मापारी यांनी आपल्या मुलाला रात्रंदिवस मेहनत करायला लावली आणि बालाजी मापारी यांनी आत्ताच झालेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन तलाठी या पदावर मजल मारली. ग्रामीण भागातील तरुणही प्रचंड मेहनत जिद्द चिकाटीच्या जोरावर देशाला गवसणी घालू शकतात ही बाब मालेगाव तालुक्यातील सोमठाणा येथील शेतकरी कुटुंबातील बालाजी मापारी यांनी करून दाखवली. बालाजी मापारी यांचे आई-वडील यांनी रात्रंदिन शेतात काम करून मुलांना मोठे बघावे यासाठी मेहनत घेतली. त्याचेच फळ म्हणून बालाजी मापारी यांनी तलाठी पदी निवड करण्यात आली. आज ग्राम सोमठाणा येथे हनुमान मंदिरावर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने बालाजी मापारी यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बालाजी मापारी यांनी सांगितले की आपल्याला जर यश संपादन करायचं असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न, मेहनत व चिकाटी करत राहावी यामुळे यश हमखास आपल्याकडे येईल असे बालाजी मापारी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया :
शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा ही आम्ही युवकांनी व गावकऱ्यांनी डिजिटल बनवली सोबतच गुणवत्तेवर भर दिला. गावातील विद्यार्थी व तरुण शासकीय सेवेत लागावीत यासाठी गांवकरी व आम्ही युवक विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी मार्गदर्शन करित असतो. त्याच माध्यमातून आत्ता आम्हाला ते फळ चाखायला मिळत आहे त्याच अनुषंगाने आमच्या गावातील बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून शासकीय नोकरीत लागत आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की या मोबाईलच्या युगामध्ये मोबाईलचा योग्य त्या वेळीच वापर करावा.

  • नारायण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, सोमठाणा ता. मालेगा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button