Uncategorized

खडसे महाविद्यालयातील हरीओम इंगळे या विद्यार्थ्याची दिल्ली येथे होणाऱ्या २६ जानेवारी २०२५ रोजीच्या एनएसएस आर.डी. परेडसाठी राष्ट्रीय संघात निवड…


श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी हरीओम इंगळे हा तृतीय वर्ष विज्ञान या वर्गात शिकत असून याची सर्वप्रथम दिनांक १० व ११ सप्टेंबर २०२४ या कालावधीत एन.एस.एस. आर. डी. परेड साठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संघात निवड झाली होती. त्यानंतर दिनांक २६ ते २८ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे निवड चाचणीत यशस्वी होऊन महाराष्ट्र संघासाठी निवड झाली. त्यानंतर दिनांक १२ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे महाराष्ट्र संघातून राष्ट्रीय स्तरावरील पश्चिम विभागासाठी निवड झाली‌ होती. तर आता तो दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या आरडी परेड साठी राष्ट्रीय स्तरावर निवडला गेला आहे.
त्याच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे मा. आमदार एकनाथरावजी खडसे साहेब व मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय अध्यक्षा मा.ॲड. सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन करून २६ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी हरीओम इंगळे याला शुभेच्छा दिल्या आहेत. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय सचिव डॉ. सी.एस. चौधरी, उपाध्यक्ष मा. नारायणदादा चौधरी व संस्थेचे संचालक मंडळ यांनी त्याचे अभिनंदन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा.डॉ. सी.एस. चौधरी यांच्या शुभहस्ते हरीओम इंगळे याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील, उपप्राचार्य आर. टी. चौधरी तसेच प्राध्यापक बंधू व भगिनी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन एन.एस. एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दीपक बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. कृष्णा गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ताहीरा मीर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button