
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा १४ मार्च २०२६
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांसाठी महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. आता प्रत्येक जनावराला १२ अंकी इअर टॅग (कानात बसविण्यात येणारा क्रमांक) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या टॅगमुळे जनावरांची अचूक ओळख पटते तसेच शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होते.
पशुपालकांनी आपल्या जनावरांची नोंदणी करून आधार आणि मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जर जनावरांना इअर टॅग लावले नाहीत तर पशुपालकांना अनेक महत्त्वाच्या सुविधांपासून वंचित राहावे लागू शकते. यात
- जनावरांवरील उपचार व कृत्रिम रेतन सेवा
•लसीकरण सुविधा
•शासकीय मदत (अतिवृष्टी, पूर इ.)
•कायदेशीर वाहतूक व खरेदी-विक्री
•बँक कर्ज व विमा संरक्षण
विविध शासकीय योजनांचा लाभ
या सर्व सुविधांचा लाभ मिळण्यासाठी जनावरांना इअर टॅग असणे आवश्यक आहे.
पशुपालकांनी लवकरात लवकर आपल्या जनावरांना इअर टॅग लावून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. यामुळे जनावरांची ओळख सुरक्षित राहील आणि पशुपालकांना भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल



