निकालाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरचा आठवडे बाजार सोमवारला ; रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व व्यापार बंद

मुक्ताईनगर | प्रतिनिधी
दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मुक्ताईनगर नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार असून, या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, मुक्ताईनगर येथील दर रविवारी भरणारा आठवडे बाजार रविवारी न भरवता पुढील दिवशी म्हणजे सोमवार, 22 डिसेंबर 2025 रोजी भरविण्यात येणार आहे.
तसेच, रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत शहरातील
— सर्व दुकाने
— हॉटेल्स
— भाजीपाला मार्केट
— हातगाडे
— गॅरेज
— व अन्य सर्व प्रकारचे व्यावसायिक व्यवहार
बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हा निर्णय निवडणूक निकालाच्या दिवशी संभाव्य तणाव, गर्दी अथवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी घेण्यात आला असून, नागरिक व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना नितीन मदनलाल जैन (बंटी जैन),
अध्यक्ष – व्यापारी संघटना, मुक्ताईनगर तालुका,
यांनी सांगितले की, “शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, व्यापारी वर्ग प्रशासनाच्या निर्णयास पूर्ण सहकार्य करणार आहे.”



