अपघातक्राईम

दुचाकीस्वाराला डंपरने दिली जोरदार धडक; वाहतूक पोलिसांनी वाचविला जीव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

दुचाकीस्वाराला डंपरने दिली जोरदार धडक; वाहतूक पोलिसांनी वाचविला जीव !

एमआयडीसीतून शहराकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली. दरम्यान, दुचाकीस्वार हा थेट डंपरच्या पुढील चाकाखाली आला. यावेळी कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतुक पोलिसांनी त्या दुचाकीस्वाराला सुखरुप बाहेर काढत त्याचा जीव वाचवला. या अपघातात दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. ही घटना दि. १७रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील एमआयडीसीकडून खडीने भरलेला (एमएच १९, सीव्ही ५९१५) क्रमांकाचा डंपर भरधाव वेगाने शहराच्यच्या दिशेने येत होता. यावेळी डंपरच्या पुढे चालणाऱ्या दुचाकीस्वाराला डंपरने जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीस्वारा हा रस्त्यावर कोसळल्याने त्याची दुचाकी थेट डंपरच्या पुढील चाकात अडकली. काही अंतरापर्यंत डंपरने दुचाकीला फरफटत नेले. यामध्ये दुचाकीस्वार हा किरकोळ गंभीर जखमी झाला. ही घटना अजिंठा चौफुलीवर कर्तव्यावर हजर असलेले वाहतुक शाखेचे पोहेकॉ गुणवंत देशमुख व विठ्ठल मुंडे यांना समजली.डंपरने दुचाकीला चिरडल्याचे दिसताच प्रसंगावधान राखत वाहतुक पोलीस देशमुख आणि मुंडे यांनी लागलीच त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी फरफटत नेणाऱ्या डंपरच्या खाली अकडलेल्या दुचाकीस्वाराला बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button