खानदेशजळगावा जिल्हा

बहिणीसोबत प्रेमसंबधांचा संशय : तरुणाला जबर मारहाण !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

प्रतिनिधी – बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून गोविंद वामन आंबेकर (वय ३१, रा. सीताराम माळी चाळ, मिल परिसर धुळे) याला तीन ते चार जणांनी लोखंडी पाइपने मारहाण केली. यात त्याचे दोन्ही पाय फ्रैक्चर झाले. ही घटना शहरातील रामेश्वर कॉलनीत घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, धुळे येथील गोविंद आंबेकर हा तरुण मिस्तरी काम करतो. १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याला चार जणांनी अडविले. त्यातील एका जणाच्या बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून या सर्वांनी त्याला शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात दोन्ही पाय फ्रैक्चर केले. तरुणीचा भाऊ, मामा अशांसह चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button