मुक्ताईनगरात तणाव: शेतकरी व आमदारांना अटक निषेधार्थ शहरात कडकडीत बंद
मुक्ताईनगरात तणाव: शेतकरी व आमदारांना अटक निषेधार्थ शहरात कडकडीत बंद
कवडीमोल भावाने शेत जमीन शासन हडपण्याचा प्रयत्न करीत असल्याने गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे परंतु या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष करून केंद्र सरकार सुलतानी पद्धतीने कारभार करीत असून शेतकऱ्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहे. आज पुन्हा पोलीस बळाचा वापर करून बंद असलेले रस्त्याचे काम सुरू करण्याच्या हेतूने प्रशासनाच्या हालचाली दिसतात शेतकऱ्यांनी पुन्हा पुन्हा फाटा तालुका मुक्ताईनगर येथे आंदोलन सुरू केले या आंदोलनात आमदार चंद्रकांत पाटील यांनीही सहभाग नोंदवला.
आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांना तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले असून अटक केली आहे व त्यांना पुढी वल कारवाईसाठी भुसावळ येथे हलवण्यात आले आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरतात मुक्ताईनगर तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि बंची हाक देण्यात आली व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने बंद मध्ये सहभाग नोंदवून प्रशासनाचा निषेध केला आहे मुक्ताईनगर अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.



