खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामलकापूरमहाराष्ट्रराजकीयशेती

गाया, म्हशी योजनासाठी २ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज

बुलढाणा प्रतिनिधी उषा इंगळे
बुलढाणा : पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरावर अनुदानावर विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी २ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अमितकुमार दुबे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. तृप्ती पाटील (खेडेकर) यांनी केले आहे.

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे – वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया चालू वर्षात राबविली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत ३ मे पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली असून २ जूनपर्यंत डेडलाइन देण्यात आली आहे. २५ते २७

जून या कालावधीत लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रातील अरीची पर्वत तयार केली जाणार आहे. या योजनेचा लाभघेण्यासाठी पशुपालकांनी अर्जासोबत स्वतःचा मोबाईल नंबर द्यावा. त्याच मोबाइल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज https:// ah. mahabms. com या संकेतस्थळावर, त्याचप्रमाणे गुगल प्ले स्टोअरवरील AH-MAHABMS या अॅप्लिकेशनद्वारे भरता येईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका ल पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा. (जिमाका)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button