बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

ऋषी महाराज संस्थान हिवरखेड येथे ऋषी पंचमी उत्साहात साजरी.

ऋषी महाराज संस्थान हिवरखेड येथे ऋषी पंचमी उत्साहात साजरी.हिवरखेड (वार्ताहर )हिवरखेडच्या उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध ऋषी महाराज संस्थान येथे ऋषी पंचमी अतिशय भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरी करण्यात आली.वैकुंठवासी ह. भ. प. श्रीधर स्वामी महाराज यांच्या मते हिवरखेड येथे असलेले ऋषी महाराज संस्थान येथे अगस्त ऋषीच्या कुळातील ऋषी महाराज ध्यानधारणा व तपसाधना करण्यासाठी या ठिकाणी आले होते. तेंव्हा पासून या ठिकाणाला ऋषी महाराज संस्थान असे नाव पडले. इथे पाण्याचा छोटा धबधबा असल्याने या ठिकाणाला ऋषी महाराज संस्थान धबधबा खारसा असे सुद्धा म्हणतात. या संस्थानचे विश्वस्त अनिल कराळे, रामेश्वर शिंगणे हे दरवर्षी नित्यनेमाने आपल्या सहकाऱ्यांसोबत ऋषी पंचमी साजरी करत असतात. यावर्षी सुद्धा होमहवन करून मंत्रउच्चारात ऋषी महाराजांची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली व महाआरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ऋषी महाराज संस्थान हे निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक निसर्गरम्य ठिकाण होय. मंदिराला लागूनच असलेल्या औदुंबर वृक्षाच्या मुळातून जमिनीवरून वाहणारा जिवंत गोड पाण्याचा झरा आहे. मोठमोठ्या वटवृक्षांनी हा परिसर व्यापला असून या ठिकाणी विलक्षण मानसिक शांतीची अनुभूती येते. एक जागृक संस्थान म्हणून ओळखल्या जाणारे हे ठिकाण पक्षीनिरीक्षण करण्यासाठी व मानसिक शांतीसाठी एक भेट द्यावे असे ठिकाण आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button