बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज संस्थान माळेगाव बाजार येथे ऋषिपंचमी निमित्त महाप्रसादाचे आयोजन.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका तेल्हारा प्रतिनिधी
संतोष गिऱ्हे
तेल्हारा :- माळेगाव बाजार येथे ऋषीपंचमी निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम गणपती आरती श्री संत गजानन महाराज महा आरती त्या नंतर माळेगाव बाजारचे कुलदैवत साध्वी चंफा माता आरती करण्यात आली त्यानंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात झाली गावाच्या आजूबाजूच्या खेड्यातील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिबाला शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय असे नारे लावून महाप्रसादाला सुरुवात केली गावातील सर्व भाविक भक्तांनी सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेतला.
महाप्रसादामध्ये पोळी, कवळ्याची भाजी,आणि मसालेदार भात, यांचा सर्व भक्तांनी महाप्रसाद देतला.



