महाराष्ट्रविदर्भ

अशोका बुद्ध विहार, देऊळगाव मही: ‘बुद्ध अँड धम्म’ ग्रंथाचे वाचन व वर्षवास समाप्ती सोहळा उत्साहात संपन्नदेऊळगाव महीअशोका बुद्ध विहार, देऊळगाव मही: ‘

अशोका बुद्ध विहार, देऊळगाव मही: ‘बुद्ध अँड धम्म’ ग्रंथाचे वाचन व वर्षवास समाप्ती सोहळा उत्साहात संपन्नदेऊळगाव मही

अशोका बुद्ध विहार, देऊळगाव मही: ‘बुद्ध अँड धम्म’ ग्रंथाचे वाचन व वर्षवास समाप्ती सोहळा उत्साहात संपन्नदेऊळगाव मही

(ता. प्र. गजानन खिल्लारे): देऊळगाव मही येथील अशोका बुद्ध विहार येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘बुद्ध अँड धम्म’ या पवित्र ग्रंथाचे वाचन आणि वर्षवास समाप्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक १० जुलै २०२५ रोजी सुरू झालेले हे ग्रंथवाचन ७ ऑक्टोबर २०२५ रोजी समारोप करून पूर्ण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परिसरातील उपासक, उपासिका आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.भव्य मिरवणूक रॅलीचे आयोजनवर्षवास समाप्तीच्या निमित्ताने भव्य मिरवणूक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली छत्रपती चौक, बस स्टँड, दत्त मंदिर चौक आणि राम मंदिर गल्ली अशा पूर्ण गावातून काढण्यात आली. या रॅलीमध्ये समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सैनिक, तसेच यशोधरा मैत्री संघाच्या पदाधिकारी व सदस्य आणि राजवाड्यातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मानपत्र प्रदान व ग्रंथाचे वाचनयावेळी प्रतिमाताई खंडागळे यांनी ‘बुद्ध अँड धम्म’ या ग्रंथाचे वाचन केले. तसेच, भंते विनाचार्य यांनी समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांच्या कमिटीकडे अशोका बुद्ध विहाराला मानपत्र सुपूर्द केले.संपूर्ण गावातून मिरवणूक रॅली काढल्यानंतर ती अशोका बुद्ध विहार येथे येऊन समाप्त झाली. या समारोपीय सोहळ्यात उपस्थित उपासक व उपासिकांना कीर्तन व भोजनदान देण्यात आले. हा धार्मिक आणि सामाजिक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button