उदयनगरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचा जल्लोष ; भव्य शोभायात्रेने वेधले सर्वांचे लक्ष

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका : प्रतिनिधी
अरुणा दत्ता खंडागळे
डीजेच्या तालावर उत्साहपूर्ण मिरवणूक; शिस्तबद्ध आयोजनात युवक-युवती, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
चिखली: तालुकयातील उदयनगर
साहित्यसम्राट, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उदयनगर येथे मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील मुख्य रस्त्यावरून डीजेव बँड च्या तालावर काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण उदयनगरचे लक्ष वेधून घेतले. युवक-युवती, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत जयंती उत्सव साजरा केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उदयनगरचे माजी सरपंच भाई प्रदीप अंभोरे, संदीप अंभोरे, मातंग सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाई छोटू कांबळे, कृष्णा साळवे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
भव्य शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी गोपाल तोडे, ज्ञानेश्वर शिंदे, वीर लहुजी आखाड्याचे अध्यक्ष अमोल साबळे, शुभम साबळे, कुणाल हातागळे, रोहन सपकाळ, कार्तिक गुडेकर, लालाभाई सपकाळ, ज्ञानेश्वर गुडेकर, तुषार साबळे, शरद हातागळे, किरण कांबळे, अमोल हातागळे, सागर कांबळे, दिलीप हातागळे, सचिन गुडेकर, अश्विन गुडेकर, किशोर सपकाळ, वैभव सपकाळ, राम हातागळे, प्रवीण आवारे, सचिन आवारे, संदीप हातागळे, कार्तिक साबळे, रुपेश साबळे यांच्यासह अनेक युवकांनी परिश्रम घेतले. तसेच हरिभाऊ हातागळे, अशोक हातागळे, सुरेश साबळे, रमेश साबळे, महादेव गुडेकर, वसंता हातागळे, विवेक गुडेकर, कैलास गुडेकर, गजानन सपकाळ, अंबादास सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ मंडळी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अमडापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. उत्साह, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा जयंती उत्सव उदयनगरकरांसाठी अविस्मरणीय ठरला.✍️



