क्राईमखानदेशगुन्हेगारीजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

निंभोरा येथील गायींची चोरी प्रकरणी चार जणांना अटक….

गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर ता प्रतिनिधी विकास आमोदकर

रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील सबस्टेशनजवळील 29 जुलै च्या रात्री वाड्यावरून दोन शेतकऱ्यांच्या एकूण ६६ हजार रुपये किमतीच्या ४ गायी चोरीला गेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी निंभोरा पोलिसांनी लक्ष्मण गोविंदा बोढे वय ६५, रा. निंभोरा बु., ता. रावेर आणि शेजारील वाडा असलेले शेतकरी सुपडू विश्वनाथ नेमाडे यांची वाड्यातून दिनांक २९/०७/२०२६ च्या रात्री २२ हजार रुपये किमतीच्या २ गायी व ४४ हजार रुपये किमतीच्या २ गायी, असा एकूण ६६,०००/- रुपये किमतीच्या ४ गायी अज्ञात चोरट्याने लांबवल्या होत्या.
​सर्वत्र शोध घेऊनही गायी न मिळाल्याने निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात CCTNS गु.र.नं. [ 172/2026 ], BNS कलम [ 303 (2) ] अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मा.पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक (जळगाव) श्री. संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी (फैजपूर) श्री. अनिल बडगुजर यांनी तपास पथकाला मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या.

​त्यानुसार, तपास पथकाने गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे सखोल तपास करून चोरीच्या गुन्ह्यातील खालील ४ आरोपींना निष्पन्न करून अटक केली.

​अटक करण्यात आलेले आरोपी
1.हयात शेख मासून मन्यार वय २५, रा. मन्यारवाडा, चिनावल, ता. रावेर 2.शेख आवेश शेख एजाज खान वय २०, रा. ख्वाजानगर, सावदा, ता.रावेर, 3.शेख राजीद शेख शरीफ वय २३, रा. ईदगाहजवळ, रसलपूर, ता.रावेर, 4.शेख नासीर शेख चांद वय ४५, रा. वरणगाव, ता.भुसावळ अटक करण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोहेकॉ अविनाश पाटील आणि पोकॉ किरण कोळी यांच्या पथकाने केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button