बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा शहरात २४ ऑगस्टला रंगणार भव्य कावड यात्रा; सकल हिंदू समाजाचे आयोजन

‘हर हर महादेव’च्या जयघोषात निघणार नगर प्रदक्षिणा; समस्त शिवभक्तांना सहभागी होण्याचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी शंकर शिवरकर

देऊळगाव राजा :हिंदू संस्कृतीचा अभिमान जपण्यासाठी आणि श्रावण महिन्याचे पवित्र औचित्य साधून सकल हिंदू समाज, देऊळगाव राजा तालुका यांच्या वतीने आगामी सोमवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भक्तीची वाट… महादेवाची साथ…’ हा मंत्र जपत निघणाऱ्या या यात्रेमुळे संपूर्ण देऊळगाव राजा शहर शिवमय होणार आहे.

सावखेडभोई येथील मेळातला महादेव मंदिरापासून सुरुवातया भव्य कावड यात्रेची सुरुवात सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सावखेडभोई येथील मेळातला महादेव मंदिर येथून होणार आहे. या ठिकाणाहून कावडधारक आणि शिवभक्त पवित्र जलाभिषेकासाठी मार्गस्थ होतील.

असा असेल भव्य नगर प्रदक्षिणा मार्ग:

शहरातील प्रमुख भागांतून ही कावड यात्रा जाणार असून तिचा मार्ग खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे:

मेळातला महादेव मंदिर येथून सुरुवातबायपास रोड ➡️ शिंगणेनगर ➡️ जालना रोडधुंडिराज महाराज मठ ➡️ वाल्मिकनगरमाळीपुरा वेश ➡️ श्री बालाजी महाराज मंदिरसंतोषी माता मंदिर ➡️ चिखली रोडचौंडेश्वरी देवी मंदिर ➡️ महात्मा फुले चौकजुना सरकारी दवाखाना ➡️ जुना जालना रोडसंतोष चित्र मंदिर मार्गे ➡️ छत्रपती शिवाजी महाराज स्मारकजाफ्राबाद रोड ➡️ छत्रपती शिवाजी राजे चौकसिव्हिल कॉलनी मार्गे ➡️ खोरेश्वर महादेव मंदिर (कावड यात्रेचा अंतिम टप्पा)

एकजूट होण्याचे आवाहन

“चला ! एकजूट होऊया, हिंदू संस्कृतीचा अभिमान जपूया !” अशी हाक देत, देऊळगाव राजा शहरातील व तालुक्यातील सर्व शिवभक्त, तरुण मंडळी, महिला आणि समस्त हिंदू बांधवांनी या भव्य कावड यात्रेत मोठ्या संख्येने आणि शिस्तीत सहभागी व्हावे, असे आग्रहाचे आवाहन सकल हिंदू समाज आयोजित कावड यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button