बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अखिल भारतीय आदिवासी क्रांती. संघटन शाखा. मुकेश भाऊ यांचे नेतृत्वाखाली उद्घाटन सोहळा संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.२१/८/२०२६.

आसलगाव: जळगाव तालुक्यातील आसलगाव येथे अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली आहे. या कार्यक्रमात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. आदिवासी समाजाच्या हक्काचे रक्षण करणे आणि अन्याय विरुद्ध लढा देणे या संघटनेचा उद्देश आहे. जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी विविध शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटित होऊन कार्य करण्याचा निर्धार सदस्यांनी व्यक्त केला.
आसलगाव आणि जळगाव तालुका पातळीवर नवीन पदाधिकाऱ्यांची बिनविरोधक निवड करण्यात आली. यावेळी आसलगाव शाखा उद्घाटनाच्या प्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष बालाजी सोनवणे. यांच्या हस्ते उप तालुका अध्यक्षपदी राजीव भाऊ तडवी. आदेश मजेलाल पवार. महासचिव पदी चंदरसिग लक्ष्मण पावरा यांना सचिव पदी नियुक्त पत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर भाऊ सोळंके. विनोद भाऊ डाबेराव. ईश्वर कुवारे.. यांच्या हस्ते अखिल भारतीय आदिवासी क्रांती शाखा स्थापन करण्यात आली.
तसेच यावेळी जळगाव जामोद तालुका अध्यक्ष अमोल डाबेराव. उप तालुकाध्यक्ष राजाभाऊ डाबेराव यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला मलकापूर तालुका अध्यक्ष सचिन चव्हाण व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button