Uncategorized
मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत नूतन विद्यालय मलकापूर येथे १२नोव्हेंबर २०२४ रोजी मानवी साखळी चे आयोजन करण्यात आले

मलकापूर प्रतिनिधी :- माननीय निवडणूक निर्णय अधिकारी 21 मलकापूर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांचे आदेशान्वये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा बोबडे प्रकाश मुकुंदे तहसिलदार नांदुरा यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढावी या साठी स्विप अंतर्गत अनेक कार्यक्रम राबवून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी नूतन विद्यालय मलकापूर येथे मतदार जनजागृती साठी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले . यावेळी नोडल अधिकारी एन. जे.फाळके, सहाय्यक नोडल अधिकारी एन. बी. शिंदे, आर. एम. वाघमारे ,नूतन विद्यालयाचे प्राचार्य अविनाश बोरले , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



