Uncategorized

अंदाधुंदी गोळीबारात माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू; भुसावळ शहरातील थरारक घटना

भुसावळ:- भुसावळ येथे अज्ञातांनी अंदाधुंदी गोळीबार करुन माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना काल दि. 29 मे रोजी रात्रीच्या सुमारास जुना सातारा परिसरात मरीमाता मंदिर नजीक घडली. या घटनेने पुन्हा एकदा भुसावळ शहर हादरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर गोळीबाराच्या घटनेने हादरुन गेले आहे. भुसावळ शहरातील जुना सातारा रोड परिसरातील मरी माता मंदिराजवळ दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या वेळी झालेल्या गोळीबारामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे शहरातील मरी माता मंदिराजवळ कारमध्ये बसलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button