शेती
अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या रावेर तालुक्यातील गावांमध्ये खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली…

दि.२६ मे, रविवार रोजी रावेर लोकसभा अंतर्गत अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची रावेर तालुक्यातील मौजे नेहेते, दोधा, अटवाडा, अजनाड, सावखेडा, खिरोदा, रोझोदा ई. गांवात स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्यासह खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच संबंधितांकडून तत्काळ पंचनामे करून घेण्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सूचना केल्या.
अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे रावेर तालुक्यातील मुख्य करून केळी पिकाचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरुपूर प्रयत्न करणार असल्याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आश्वासन देऊन धिर दिला.



