Uncategorized
साईबाई मोटे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान अनोळखी इसमाचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । स्थानिक सईबाई मोटे शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केलेल्या एका अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा मेमो २४ मे रोजी समोसा रूग्णालयाकडून शहर पो.स्टे.ला देण्यात आल्यानंतर शहर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून छायाचित्र व वर्णनावरून मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनोळखी इसमाचे वय ५० वर्षाचे आसपास असून वर्ण सावळा, उंची ५ फुट ५ इंच, अंगात कथीया रंगाचे शर्ट, ग्रे रंगाची पँट, डोक्याचे वाढलेले केस काळे पांढरे, दाढी मूछ वाढलेले काळी पांढरी. तरी अशा वर्णनाचा इसमाबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी पोहेकॉ संजय करूटले यांच्याशी ८९९९९६९९४१ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे



