विदर्भसामाजिक

उघड्यावर मास विक्री, दुर्गंधीमुळे भाविक त्रस्त! मेहकर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उचलली उपोषणाचे शस्त्र! प्रशासनाच्या कारवाई ची ‘वाट ‘बघून त्रस्त झालेल्या भक्तांनी बदलली वाट!

उघड्यावर मास विक्री, दुर्गंधीमुळे भाविक त्रस्त! मेहकर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उचलली उपोषणाचे शस्त्र! प्रशासनाच्या कारवाई ची ‘वाट ‘बघून त्रस्त झालेल्या भक्तांनी बदलली वाट!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

शहराचे आराध्य दैवत असलेल्या आणि तिरुपती बालाजीचे मोठे भाऊ अशी धारणा असलेल्या श्री शारंगधर बालाजी भगवान च्या मंदिराकडे जाणारा रस्ता घाणीच्या विळख्यात असल्याने प्रशासनाकडून
उघड्यावरील मास विक्री बंद होईल व तशा प्रकारची कारवाई केल्या जाईल याची वाट पाहून कंटाळलेल्या बालाजी भक्तांनी मंदिराकडे जाणारी ‘वाट ‘च बदलली आहे. याबाबत असे की, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाल्यापासून बालाजी मंदिर मध्ये महाराष्ट्रातून व पंचक्रोशीतील भाविक श्री शारंगधर बालाजी मंदिरात दर्शनासाठी येतात. याच रस्त्यावर श्रीक्षेत्र ओलांडेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे तर त्याला लागून अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली ऐतिहासिक दगडी धर्मशाळा आहे. एवढे आध्यात्मिक, प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्रास उघड्यावर मास विक्री करण्यात येत आहे.
नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्स मध्ये नियमाने मास विक्री करता येत नाही. तरीही नियम धाब्यावर बसवून अनेक वर्षापासून कॉम्प्लेक्स मध्ये मास विक्री सुरू आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करून मास विक्री सर्रास सुरू आहे. इतकेच काय तर नगर परिषदेच्या भाजीपाला मार्केटला पाच घेत आहे या पाच गेट मधील केवळ एक गेट नागरिकांसाठी खुला राहिलेला आहे. चार गेटवर अतिक्रमण झाले आहे त्यातील तीन गेटवर पक्के बांधकाम करण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाचे ऐतिहासिक पौराणिक वस्तूच्या तीनशे मीटर पर्यंत पक्के बांधकाम किंवा अतिक्रमण करता येत नाही हा नियम असताना सुद्धा ओलांडेश्वर मंदिराच्या समोर मंदिरापासून तर दगडी धर्मशाळा म्हणजेच मठ ते ऐतिहासिक जानेफळ वेस पर्यंत अतिक्रमणा मुळे भावी त्रस्त झाले आहे. रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमण पालिकेला कसे दिसत नाही? असा सवाल शहरातील सामान्य नागरिकांना पडला आहे. हे पाहता मेकर शहरातील बालाजी संस्थानचे विश्वस्त उमेश मुंदडा,ह भ पण भागवत लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहे. परंतु झोपेची सून घेणाऱ्या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती रोजी नगर परिषदेच्या आवारामध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. भाविकांना होणारच त्रास लक्षात घेता व परिसरातील नागरिकांचे व भक्तांचे दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button