बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अंतरी खेडेकर व सावरगाव डुकरे येथील महिला व पुरुषांचा भाजपात प्रवेश!आमदार श्वेता ताई म्हणाल्या, सर्व समावेशक विकासासाठी निरंतर कार्यरत: आ. श्वेता ताई महाले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

आमदार म्हणून चिखली मतदार संघाच्या सर्व समावेशक विकासासाठी मी निरंतर कार्यरत आहे, असे प्रतिपादन आ. श्वेता ताई महाले यांनी 24 सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
तालुक्यातील सावरगाव डुकरे आणि अंत्री खेडेकर येथील शेकडो महिला व पुरुषांनी आ. महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी बोलताना आ. महाले यांनी भाजप शासित केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी कामगिरीवर प्रकाश टाकला. गेल्या 27 वर्षापासून संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेले महिला आरक्षण विधेयक मंजूर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मोठी ऐतिहासिक कामगिरी केली. यातून त्यांनी महिला सहशक्तीकरण केले असून यामुळे देशातील लोकशाही सुद्धा बळकट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अंत्री खेडेकर येथील उषा माळेकर, राम माळेकर, विठ्ठलराव खेडेकर, हरिभाऊ खेडेकर, अशोक माळेकर, केशव माळेकर, परमेश्वर माळेकर, केशवराव गावंडे, ज्ञानेश्वर माळेकर, शिवाजी माळेकर, मधुकर खेडेकर, गजानन माळेकर, आत्माराम माळेकर, किशोर माळेकर, कैलास माळेकर, गणेश माळेकर, नंदकिशोर माळेकर, अशोक शिंदे, शेख जावेद शेख हबीब, सय्यद सलीम सय्यदं अन्वर, समाधान मोरे, गजानन चांदले, गजानन चंद्रशेखर, सय्यद हसन, अशोक माळेकर, भगवान मोरे, नारायण माळेकर, भागवत माळेकर, लक्ष्मण माळेकर, नारायण माळेकर, भागवत माळेकर, श्रीराम माळेकर, आत्माराम पवार, अनिल पवार, आकाश खेडेकर, ज्ञानेश्वर खेडेकर, रामदास माळेकर, रमेश माळेकर, तर सावरगाव डुकरे येथील सुशीला डुकरे, अर्चना पंडित, नंदा जाधव, ज्योती जाधव, शकुंतला जाधव, छाया जाधव, लक्ष्मी डुकरे, वानखडे, सरला डोंगर दिवे, अनिता जाधव, सुनिता जाधव, संगीता तायडे, मंगला छवंदे, अर्चना जाधव, कविता जाधव, दिपाली जाधव, शीला जाधव, आम्रपाली जाधव, प्रभाबाई जाधव , कचराबाई जाधव, रंजना जाधव, प्रभाबाई जाधव, अस्मिता जाधव, ज्योती जाधव, आदी महिलांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी दिलीप खेडेकर, नाना खेडेकर, रमेश खेडेकर, मनोज पाटील, डॉ कृष्णकुमार सपकाळ, सुनील पोकळे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button