Uncategorized

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष मालेगांव तर्फे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा निषेध

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष मालेगांव तर्फे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा निषेध

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव :आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालेगाव तालुका च्या वतीने भाजप नेते किरीट सोमय्या यांना चपला चा हार घालून जोडे मारो आंदोलन तालुकाप्रमुख उद्धव पाटील गोडे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना शहर प्रमुख चादमल आहीर यांच्या उपस्थितीत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या अश्लील कृत्यांचा जाहीर निषेध करण्यात आला महाराष्ट्रातील इतर पक्षातील नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दुसऱ्या वरती चिखल फेक करणारा किरीट सोमय्यांचा खरा चेहरा तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आला अतिशय अशोभनीय अश्लील कृत्य त्यांनी केलं त्याचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी असे निवेदन सुद्धा माननीय पोलीस निरीक्षक मालेगाव यांना देण्यात आले यावेळी मालेगाव तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल शिंदे,भगवान बोरकर,गजानन बोरचाटे,भारत घुगे,सोनू सांगळे,,न्यानेश्वर बळी,राजु लेकुरवाळे, आशिष डहाळे,हरिभाऊ लहाने,गणेश सरनाईक, दीपक दहात्रे, केशव ठाकरे,रामेश्वर नवघरे, विठ्ठल नवघरे,
सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button