लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन फाशीची शिक्षा देणेबाबत.

लैंगिक अत्याचार ) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन फाशीची शिक्षा देणेबाबत.
प्रति,
मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई.
व्दारा
मा.उपविभागीय अधिकारी, खामगांव
विषय – निवघा ता.मुदखेड जि.नांदेड येथील आरोपी ज्ञानेश्वर पवार यांच्यावर पोस्को (बाल
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
लैंगिक अत्याचार ) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन फाशीची शिक्षा देणेबाबत.
महोदय,
उपरोक्त़ विषयान्वये महाराष्ट्रातील संपुर्ण कासार समाजातर्फे आपणास विनंती पुर्वक निवेदन करतो की, मुदखेड तालुक्यातील निवघा गावातील कासार समाजाची अल्पवयीन विद्यार्थीनी कु.सपना सतीष पेदे वय 17वर्षे हिचा गावगुंड ज्ञानेश्व़र ऊर्फ सोन्या याने मागील वर्षभरात अनेकवेळा छेडछाड करुन अतोनात छळ केला गावगुंडाच्या या छळामुळे अखेर दि.12/07/2023 रोजी या अल्पवयीन मुलीचा बळी घेतला. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे या गावगुंडावर पोस्को (बाल लैंगिक अत्याचार कायदयांतर्गत) गुन्हा दाखल करुन आरोपींस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी समस्त़ कासार समाजाची मागणी आहे. आपल्या शासनात महिला, युवती व विद्यार्थींनींमध्ये सुरक्षीततेची भावना निर्माण होण्यासाठी अशा गांवगुंडावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. आज अशा घटनेमुळे समाजमन खिन्ऩ झाले आहे. जनसामान्यात रोष निर्माण झाला असून गावगंडावर वेळीच आळा घालून महिला, मुलींना सुरक्षीततेचे वातावरण निर्माण करणेसाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
तरी आपण नांदेड पोलीस अधिक्षकांना तात्काळ आरोपीं ज्ञानेश्व़र पवार वर पोस्को (बाल लैंगिक अत्याचार कायदयांतर्गत) गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात यावे अथवा संपुर्ण महाराष्ट्रातील कासार समाजाला पिडीत कुटूंबाला न्याय मिळण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. आम्हाला आपणाकडूनच न्यायाची अपेक्षा आहे.



