अनिल गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

*अनिल गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा तालुका प्रतिनिधी
व्ही.एम.घोडेतेल्हारा
दि.2;- प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि.01 जुलै शनिवार रोजी तेल्हारा शहरा सह तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तेल्हारा शहरा मध्ये स्थानिक इंदिरानगर येथील श्री संत जगनाडे महाराज शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्कूल बॅग सह शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच तालुक्यातील कोठा व जस्तगाव या गावामध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्ला येथे भवानी मातेच्या मंदिरामध्ये महापूजा करून वाढदिवस साजरा करण्यात आला, काळेगाव येथे वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे रुग्णांना फळ वाटप व गौतमेश्वर मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक करून लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लोकजागर मंच व प्रहार जन शक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



