शेगावा त धुलीवंदनाचा उत्साह..

शेगावा त धुलीवंदनाचा उत्साह..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगांव – राज्यातही आज होळी आणि धुलीवंदनाचा सण उत्साहानं साजरा केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानं सुमारे तीन वर्षांनंतर सगळीकडेच नागरिक एकमेकांना रंग लावून धुलीवंदनाचा आनंद घेत आहेत. सर्वत्रच लहान मुलांमध्ये धुलीवंदन साजरा करायचा सर्वाधिक उत्साह दिसून येत आहे.
होळीपौर्णिमेनिमित्त काल होलिका दहन केल्यानंतर आज होळीचा रंगोत्सव संपूर्ण देशासह परदेशांतही अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल घेऊन येणाऱ्या या रंगोत्सवानिमित्त नागरिकांनी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या आहेत.
हा उत्सव सगळ्यांच्या आयुष्यात उत्साह आणि आनंद घेऊन येवो. या उत्सवामुळे सगळ्यांच्या आयुष्यात सकारात्मक उर्जा निर्माण होते.



