लोणी बू शेत शिवारात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

लोणी बू शेत शिवारात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू *वाशिम जिल्हा प्रतिनिधी* *अजय गायकवाड* वाशिम /रिसोड : – तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बू येथील अल्प भूधारक शेतकरी. बबन उमाजी इंगोले यांच्या गावाच्या दक्षिणेकडील शेतात गावापासून जवळपास दोन किलो मिटर अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या मृत अवस्थेत पडलेला असल्याचे शेतकरी बंबन उमाजी इंगोले यांच्या पाहिले असता त्यांनी सदर घटनेची माहिती बुलढाणा वन क्षेत्रातील वन रक्षक यांना देण्यात आली परंतु सदर घटना ही वाशिम जिल्हा वन विभाग हद्दीतील असल्याने रिसोड वन विभागाला कळवण्यात आले. काल दिनाक 26 जुन 2023 रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान वन विभगाच्या कर्मचाऱ्यांनी सदर मृत बिबट्याला बाहेर काढून रिसोड येथे डॉ कांनफाडे सहा.आयुक्त,जे.पी. केंद्रे,डॉ रोकडे, कराले, आदींनी शवविच्छेदन करून वन वनविभगाच्या ताब्यात दिल्यानंतर सदर बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी अग्निदाह देण्यात आला .बिबट्याचे वय अंदाजे 10 ते 11महिने असून नर जातीचे होता. सदर बिबट्याचा पाण्याच्या शोधात मृत्यू झाला असल्याचे बोलल्या जात आहे.



