Uncategorized

खेड्यातील युवकांना रेती माफिया बनण्यापासून कोण रोखणार.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :-सागर रावण चोरे तालुका प्रतिनिधी शेगाव.

ब्रम्हपुरी(दि.15एप्रिल):- शिक्षणामध्ये अतिप्रगतशील धाव घेणाऱ्या ब्राम्हपुरीतील युवकांचे भविष्य अंधाराच्या वाटेवर आहे. खेड्या भागातील युवकवर्ग शिक्षण सोडून रेती तस्करीच्या कामावर लागला आहे. अशा परिस्थितीत खेड्यातील युवकांना रेती माफिया बनण्यापासून कोण रोखणार? असा प्रश्न सुशिक्षित नागरिकांमध्ये उद्भवत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात वैनगंगा नदीकाठी अनेक महत्त्वाचे रेतीघाट आहेत. अर्हेर- नवरगाव, कोलारी, वाकल, विरव्हा, रणमोचन आणि सोंदरी हे येथील प्रमुख रेतीघाट असून, या ठिकाणाहून बेकायदेशीर रेती उत्खनन आणि अतिरिक्त उपशामुळे हे घाट नेहमीच चर्चेत आहेत . अवैध रेती उत्खननामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून शासनाचा महसूल बुडवला जातो. रेती तस्करीमुळे कितीतरी निष्पाप शाळकरी मुलांचे, नागरिकांचे जीव गेले.

वाहतूक पोलिस व एलसीबीचेही पथक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी शेकडो कर्मचारी, दोन डझन वाहने, कारवाईचे अधिकार असतानाही मात्र रेती चोरीच्या प्रकरणात हतबल असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे कारण या सर्वांचे खिशे गरम होत असल्याने घाटमालक व मोटारमालक बिनधास्तपणे कोट्यवधींची रेती चोरून सरकारचा महसूल बुडवित आहे. लहान मोठे मच्छर मारण्यापेक्षा मगरमच्छला केव्हा मारतील अशी चर्चा नागरिकांमध्ये नेहमीच होताना दिसत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button