बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बुरुंगले महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आला एक अनोखा उपक्रम, प्लॅस्टिक वापराला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा पुढाकार….!

   स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, 


 प्रतिनिधी:-रतन भगत. 

दि.१३/३/२०२६. शेगाव:-सविस्तर वृत्त असे की आज प्लॅस्टिक बंदी हा शासकीय नियम असला तरी त्यांचे उल्लंघन हे सर्वोतपरी होत असताना आढळून येत आहे. परंतु प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यापेक्षा आता त्या प्लॅस्टिकच्या वस्तू वापरणे किंवा त्या वस्तू टाळण्याकरता स्वतःपासून सुरुवात करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. तरी आजच्या अत्याधुनिक युगात बाहेर गावावरून वस्तू आणणे व इतर खाद्यपदार्थ आणणे व सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या ताटांचा व वस्तू आणण्यासाठी सर्वतोपरी वापर वाढला आहे. प्लास्टिक वापरामुळे प्रदूषण निर्माण होत असून त्याचा मानवी आरोग्याला फार मोठा धोका असल्याचे सांगितले जात असले तरी याबाबत यात जनतात ज्ञात असूनही सुद्धा व सुज्ञ नागरिक याकडे कानाडोळा करीत असल्याने प्लॅस्टिक वापर हा आजच्या युगामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे पाहण्यास मिळून येत आहे. प्लॅस्टिक मुक्त शहर करण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेची नोंदणी ही जरी असली तरी कागदपती गुंडाळण्यात येत असल्याने या प्रशासनाची निर्बंध असतानाही प्लास्टिक बंदी ही सर्वात सुरू आहे. त्यामुळे जनजागृती करण्यापेक्षा स्वतःपासूनच कृतीशील व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून बुरुंगले कला विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्लास्टिक निर्मूलनाकरिता पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या ग्रामीण भागातील शिबिरादरम्यान दैनंदिन वापराकरिता व जेवण चहा नाश्ता वापराकरता प्लास्टिकच्या पत्रावळील व ग्लास न वापरता स्टील व खानापिण्यायोग्य असलेल्या धातूच्या भांड्यांचा वापर करून प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम टाळण्याचा हा प्रयत्न नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरेल. तसेच बुरुंगले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर इ हडसन यांच्याशी जनसमुहाच्या माध्यमातून विचारणा केली असता आणि या अभिनय उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले असता त्यांनी सांगितले की प्रायोगिक तत्त्वावर लहान मोठ्या घरगुती कार्यक्रमाकरिता जेवण करता प्लास्टिकच्या वस्तूचा वापर टाळून आयोजकांनी स्थिर चे ताट वाट्या व ग्लास वापरावे. त्याकरिता महाविद्यालयाच्या माध्यमातून संबंधितांना हे साहित्य मोफत देणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्राध्यापक खडसान यांनी हेही सुद्धा सांगितले की प्लास्टिक पर्यावरणाला घातक होत आहे त्यामुळे जनजागृती आयोजित कृती महत्त्वाची आहे . करते का तत्परतेने राष्ट्रहिता बाबतचा हा उपक्रम नक्कीच समाज उपयोगी ठरावा याकरिता महाविद्यालयाने यासाठी पुढाकार घेतला असल्याचे संबंधित महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button