Uncategorized

श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात रक्तगट तपासणी शिबिर संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस

प्रतिनिधी

03/09/2025


मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मुक्ताईनगर द्वारा संचलित श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागाद्वारे दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी रक्तगट तपासणी शिबिर संपन्न झाले. रक्तगट शिबिर तपासणीचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन या.ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ. एस. बी. साळवे व डॉ. वंदना चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तगट तपासणी करून घेतली. रक्तगट तपासणी शिबिर आयोजनात प्राणिशास्त्र विभागातील विद्यार्थी तुषार तेली,कल्याणी डापके दीक्षा दुट्टे,अभय पाटील व शेख तोफिक यांनी मदत केली. या कार्यक्रमाचे आयोजन प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. टी. चौधरी, सहाय्यक प्राध्यापक डॉ.सुरेखा डी. चाटे व डॉ. एस. के. थोरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वनस्पती विभाग प्रमुख प्रा.संगीता देशमुख व श्री अशोक पाटील यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button