न.प. तेल्हाराला तीन दिवसाचा अल्टिमेटम!

न.प. प्रशासनानी वेळीच तातडीने उपाययोजना करण्याची गरज !
अन्यथा दालनात गावातील मोकाट कुत्रे-गाढव-गुरे सोडुन आंदोलन करण्याचा गौरव आप्पा धुळे युवा सेना यांचा इशारा!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा दि.३ सप्टें. | तेल्हारा येथील युवा सेनेच्या वतीने नुकतेच नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले असून त्या निवेदनामध्ये तीन दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आलेला आहे. सविस्तर वृत्त असे की, न.प.तेल्हारा हद्दीत मोठ्या प्रमाणात कुत्रे, गाढव ,गुरे आदींचा मुक्त संचार सुरू असल्याने दररोज रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. याबाबत अनेक दिवसापासून नगरपरिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे अनेकांनी माहिती देऊन जागृत केले परंतु नगरपरिषद प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याने संतप्त होऊन गौरव आप्पा धुळे युवा सेना तेल्हारा यांचेकडून नुकतेच नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन शहरात मुक्त संचार करणाऱ्या मोकाट जनावरांवर वेळीच उपाययोजना करण्या करिता तीन दिवसाचा अल्टिमेटम निवेदनाद्वारे देण्यात आला आहे अन्यथा नगरपरिषदेच्या दालनात कुत्रे, गुरे ,गाढव आदी जनावरे सोडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. हल्ली सण, उत्सव व गणेशोत्सव सुरु आहे. यातच मोकाट जनवारांचा एखाद्या श्री गणेशाच्या मूर्तीला धक्का लागून विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाले तर सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत सर्व गणेश उत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांनी तोंडी तक्रार शांतता समिती सभेमध्ये केली होती. पण त्यावरही कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याची जनमानसात चर्चा आहे. या अनुषंगाने युवासेना तेल्हारा शहरच्यावतीने मंगळवार दि २ सप्टेंबरपासून ३ दिवसांचा अल्टिमेट नगर परिषद प्रशासनाला देण्यात आला असून कारवाई न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मोकाट जनावरे सोडून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, अशा प्रकारचे निवेदन युवा सेना शहर प्रमुख गौरवआप्पा धुळे यांच्या नेतृत्वात नगरपरिषद प्रशासक सतीश गावंडे यांना देण्यात आले तसेच त्याची प्रतिलिपी ठाणेदार पोलिस स्टेशन तेल्हारा यांना सुद्धा देण्यात आली आहे.
तेल्हारा शहरातील महिला व तीच्या बाळाला धडक देण्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर न.प. प्रशासना विरोधात जनमानसात तीव्र रोष निर्माण होत आहे.
काही दिवसाआधी तानाजी मंडळ परिसरात रस्त्याने चालत असलेल्या महिलांना गुरांनी धडक दिली व त्या फरफट रस्त्याच्या कडेला असलेल्या काँक्रीट वट्यावरती पडल्या व बाळ सुखरूप वाट्यावर फरफटत गेले परंतु बाळाला कोणत्याच प्रकारची दुखापत झाली नाही हे त्याचे नशीब हे प्रत्यक्ष दर्शनी सुद्धा पाहिले व हा प्रकार तेथे असलेल्या एका कॅमेरात सुद्धा कैद झाला आहे.परंतु महिलेला मात्र दुखापत झाली नसून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासना विरोधात जनमाणसात तीव्र रोष निर्माण होत आहे . हा व्हीडिओ पाहिल्यावर नागरिक व लहान मुलांमध्ये आता मोठ्या प्रमाणात भय निर्माण झाला आहे.
अनेक दिवसांपासून तेल्हारा शहरात मोकाट जनावरे गाढव ,कुत्रे ,गुरे यांनी थैमान घातले असून सामान्य नागरिकांचे जगणे धोकादायक होत आहे.
तरी नगरपरिषद प्रशासनाने बातमीची दखल वेळीच घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.



