पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर साठी पॅकेज जाहीर करावे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संपादकीय. पंजाब
उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर मध्ये पावसाने कहर केला आहे तर अनेक ठिकाणी पूर आला आहे तर त्यामुळे या राज्यांना पॅकेज जाहीर करावे अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे तसेच येथे बचाव कार्यात गती द्यावी असे राहुल गांधी म्हणाले.
ॲक्शन वर पोस्ट करून राहुल गांधी म्हणाले की पंतप्रधान मोदीजी पंजाब मध्ये पुरामुळे भीषण हाकार माजला आहे जम्मू काश्मीर हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे अशा कठीण काळात तुमचे लक्ष आणि केंद्र सरकारची सक्रिय मदत फारच आवश्यक आहे.
हजारो कुटुंबे आपले घर आपले जीवन आणि आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी झगडत आहेत या राज्यासाठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी तातडीने विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे आणि मदत व बचाव कार्यांना गती देण्यात यावी असेही राहुल गांधी म्हणाले.



