बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अतुल्य वर्षावासातून ५६ गावांत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथवाचनाचा जागर…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

प्रिप्री अडगाव:- २८ ऑगस्ट २०२६
भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम प्रिप्री अडगाव येथे धम्मग्रंथाचे वाचन, पठण व विश्लेषण
प्रिप्री अडगाव, ता. संग्रामपूर भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा प्रिप्री अडगाव, तालुका संग्रामपूर येथे आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात करण्यात आली आहे. या वर्षावासाच्या माध्यमातून भगवान बुद्धांच्या विचारांचा आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मविचारांचा प्रसार करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आयु. किशोर भाऊ भिडे तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील ५६ गावांमध्ये बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या धम्मग्रंथाचे वाचन, पठण व मनन सुरू आहे. या उपक्रमामुळे विविध गावांमध्ये धम्मग्रंथाच्या माध्यमातून बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा जागर केला जात आहे. प्रिप्री अडगाव येथे सुरू असलेल्या वर्षावासात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन व विश्लेषण आयुष्यमाननी कांचन संतोष गायगोळ यांच्या माध्यमातून केले जात आहे. ग्रंथातील विचार सर्वसामान्यांना समजावून सांगत बुद्धांचा धम्म, समता, बंधुता, करुणा आणि विवेकशील जीवनपद्धती याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
या वर्षावासाच्या निमित्ताने सुजाता महिला संघ तसेच सम्राट अशोक मित्र मंडळ, प्रिप्री अडगाव यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक नियमितपणे उपस्थित राहत आहेत. सामूहिक वाचन, पठण आणि विचारमंथनामुळे गावातील वातावरण धम्ममय झाले असून महिला व युवकांचाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी यांनी वेळोवेळी प्रिप्री अडगाव येथे भेट देऊन वर्षावासाच्या उपक्रमाची पाहणी केली आहे. या भेटीदरम्यान धम्मग्रंथ वाचन आणि विचारप्रसाराच्या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button