जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पत्नी व मुलीच्या भेटीवरून वाद; गारगुंडी येथे शेतकऱ्यास मारहाण व जीवे मारण्याची धमकी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी –शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : पत्नी व मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यास नातेवाईकांकडून शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना गारगुंडी ता. देऊळगाव राजा येथे घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश नारायण इलग (वय 39, रा. सोयंदेव ता. सिंदखेडराजा) यांच्या पत्नी व मुलगी मागील 14 महिन्यांपासून आरोपींच्या गारगुंडी येथील घरी राहत आहेत. पत्नी व मुलीची भेट घेण्यासाठी गणेश इलग हे गारगुंडी येथे गेले असता, आरोपी सुधीर भानुदास काकड यांनी पत्नीचे दुसरे लग्न लावून दिल्याचे व मुलगी अपूर्वा हिला पुणे येथे तिच्या मामाकडे पाठविल्याचे सांगितले.
यावेळी मुलीची भेट घालून देण्याची विनंती केल्याने वाद निर्माण झाला. आरोप आहे की, आरोपीने फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करून तोंडात चापट मारल्या. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या भावजयीला आरोपी राधाबाई भानुदास काकड यांनी लोटपाट करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी गणेश इलग यांच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 393/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 296, 115(2), 351(2), 351(3), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे (बकल नं. 1202) करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button