महाराष्ट्रविदर्भ

श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तेल्हारा शहरात २२ जानेवारी रोजी श्रीराम सेना सकल हिंदू बांधवांच्या वतीने पद यात्रेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.२१; होऊ घातलेल्या
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरात श्रीरामललाजींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी पार पडत आहे या पावन पर्वावर तेल्हारा शहरातील टावर चौक येथे सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम सेना सकल हिंदू बांधवांच्या वतीने सकाळी पद यात्रा ,सायंकाळी रामलाल महाआरती ,सामुहिक हनुमान चालीसा पठण ,रोशनाई तसेच संगितमय भजन गित ई. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी २२ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता शिवाजी हायस्कुल येथुन पदयात्रा काढण्यात येणार असून या पद यात्रेचा समारोप शाळा क्र.-१ येथे करण्यात येणार आहे तसेच सायंकाळी ०६:००वा.पासुन तर रात्री १०:०० वाजेपर्यंत तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराज परीसर टावर चौक येथे रामलला महाआरती ,सामुहिक हनुमान चालीसा पठण ,रोशनाई तसेच संगितमय भजन गित व प्रसाद वाटप आदी. कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम सेना सकल हिंदू बांधव तेल्हारा च्या वतीने करण्यात आले आहे
तेल्हारा शहरातील सर्व रामभक्त यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे तसेच
रात्री घरोघरी दीपावली साजरी करण्याचे आवाहनही आयोजकांनी यानिमित्त केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button