बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव महीतील पाच जणांची शिक्षकपदी निवड

सत्कार सोहळ्यात नवनियुक्त शिक्षकांचा गौरव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२५ अंतर्गत देऊळगाव मही गावातील पाच जणांची महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये शिक्षकपदी निवड झाली आहे. या निमित्ताने गावातील नवनियुक्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये आप्पाराव खेडेकर, दीपक हरिभाऊ शिंगणे, विठ्ठल दत्तात्रय शिंगणे, कु. अश्विनी अवसरमोल आणि सौ. प्रियंका मुकेश शिंगणे यांचा समावेश आहे.

शिक्षकपदी निवड झालेल्या उमेदवारांनी मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून हे यश मिळविल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञान देतानाच त्यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासात योगदान देण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

या निवडीबद्दल गावातील नागरिकांकडून नवनियुक्त शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी व शिवसेना (शिंदे गट), देऊळगाव मही यांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमाला गणेश शिंगणे, गणेश नागरे, तुळशीराम पंडीत, श्रीकिसन शिंगणे, केतन कुलकर्णी, रवींद्र शिंगणे फौजी, राजेंद्र शिंगणे, रवींद्र इंगळे, सचिन शिंगणे, ज्ञानेश्वर वाघ, अर्चना अवसरमोल, कैलास राऊत, प्रदीप अवसरमोल, ऋषिकेश शिंगणे आदी उपस्थित होते.

नवनियुक्त शिक्षकांच्या निवडीमुळे देऊळगाव महीतील विद्यार्थ्यांमध्ये व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांमध्येही सकारात्मक संदेश गेला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button