क्राईमजळगावा जिल्हारावेर

सावदा पोलिसांची मोठी कारवाई: संशयास्पदरित्या ट्रकच्या बॅटऱ्या चोरून नेणाऱ्या एका आरोपीला पकडले; ७१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
सावदा प्रतिनिधी : विनोद तायडे

सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रगस्ती दरम्यान पोलिसांनी एका संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या ३ मोठ्या बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७१,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील:
दिनांक २७/०८/२०२६ रोजी रात्री २३:०० ते २८/०८/२०२६ रोजी सकाळी ०५:०० वाजेच्या दरम्यान सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व होमगार्ड हतनूर धरणाकडून हतनूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रगस्त (पेट्रोलिंग) घालत होते. रात्री अंदाजे ०१:३० वाजेच्या सुमारास उदळी गावाच्या बसस्थानकाजवळ पोलिसांना एका मोटारसायकलवर (CBZ Xtreme) दोन इसम संशयास्पदरित्या गोणपाट घेऊन येताना दिसले.
पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून रात्री ०१:४५ वाजेच्या सुमारास त्यांना गाठले. यावेळी मोटारसायकल चालवणारा इसम पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत गल्लीबोळातून पळून जाण्यात यशस्वी ठरला. परंतु, पाठीमागे बसलेल्या आरोपीला पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले.
आरोपीची माहिती:

  • ताब्यात घेतलेला आरोपी: विशाल शांताराम कोळी (वय २८ वर्ष, रा. कडगाव, ता. यावल, जि. जळगाव).
  • पळून गेलेला आरोपी: मोहन प्रकाश कोळी (रा. कडगाव, ता. यावल, जि. जळगाव).

जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत ₹ ७१,०००/-):
१) एम.एच.१९.बीएफ.९३४७ (MH.19.BF.9347) क्रमांकाची काळ्या रंगाची सीबीझेड एक्स्ट्रीम मोटारसायकल (किंमत ₹ ५०,०००/-)
२) QUICK START WF1000 कंपनीची पांढऱ्या रंगाची ट्रकची बॅटरी (किंमत ₹ ७,०००/-)
३) REVOLT AUTOMATIC BATTERY कंपनीची पांढऱ्या-लाल रंगाची ट्रकची बॅटरी (किंमत ₹ ७,०००/-)
४) GLOBAL KP25K कंपनीची पांढऱ्या-लाल रंगाची ट्रकची बॅटरी (किंमत ₹ ७,०००/-)
पोलीस कारवाई:
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे मोटारसायकलमधील गोणपाटात असलेल्या ट्रकच्या बॅटऱ्यांबाबत विचारपूस केली असता, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. सदर बॅटऱ्या जळगाव शहरातील रस्त्यावर लावलेल्या ट्रकमधून काढून चोरून आणल्याचा संशय आल्याने पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला.
या संदर्भातील फिर्याद पोलीस कर्मचारी सुनील जानकिराम कुरकुरे यांनी दिली असून, सावदा पोलीस ठाण्यात FIR क्र. ०२२२/२०२६, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सावदा पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोहेका/अक्षय हिरोळे, पो.कॉ. सुनिल कुरकुरे, संजय तडवी, होमगार्ड प्रशांत पाटील, संतोष सपकाळे अशांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button