Uncategorized
थंडीच्या कडकडीत वाढ

तेल्हारा : दि. 12 डिसेंबर | अकोला जिल्ह्यात गत दोन – चार दिवसापासून थंडीचा जोर खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून त्याची गंभीरता लक्षात घेता तेल्हारा शहरातील काही महिला शेकोटी चा सहारा घेत आपल्या शरीरात उब निर्माण करीत आहेत. त्यामध्ये 95 वर्षाच्या वृद्ध महिलेसोबत इतरही महिला उब घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत त्या क्षणाचे हे विहंगम दृश्य.



