Uncategorized

ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मालेगावात भव्य मिरवणूक

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – जगाला मानवतेचा व बंधुत्वाचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांच्या जयंतीनिमित्त जश्ने ईद ए मिलादुन्नबी जुलूस शनिवार 21 सप्टेंबरला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात निघाला. या जुलूसमध्ये सामाजिक सद्भावनेचे दर्शन घडले.

ईद ए मिलादुन्नबीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्याची शहरात परंपरा आहे. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून निघून शांततेत पार पडली. शहरासह तालुक्यातील नागरिकांनी व विविध मान्यवरांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. यंदा सोमवार १६ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा झाला. या सणाच्या दिवशी शहरात मोठी मिरवणूक काढण्यात येते; परंतु यावर्षी १७ सप्टेंबर गणेश विसर्जन होते. ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक शनिवार 21 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज शनिवारला शहरातून ईद-ए-मिलादुन्नबीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील नगीना मजेत टिपू सुलतान चौक येथून प्रारंभ झालेली मिरवणूक शिव चौक, गांधी चौक मार्गे मेडिकल चौक, जुने बस स्टँड, जामा मस्जिद चौक येथीन जोगदंड हॉस्पिटल, गांधी चौक मार्गाने टिपू सुलतान चौक येथे मिरवणूक पोहोचली. या मिरवणुकीचत हजारो नागरिकांनी’ सहभाग घेतला. शहरासह तालुक्यातील नागरिकांनीसुद्धा या मिरवणुकीत सहभाग घेतला.

मिरवणुकीचा मालेगाव पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात निघणारी ईद ए मिलादुन्नबीची मिरवणूक शांततेत व धार्मिक सलोखा राखत पार पडावी, याकरिता मालेगाव पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक मार्गावरील प्रमुख चौकांसह जागोजागी पोलिसांसह महिला पोलीस. त्यासोबतच ठिकठिकाणी कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मार्गावर ठिकठिकाणी मिठाई, पाणी, फळे, शरबत, पोहे, पेंडखजूर याची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील विविध राजकीय मान्यवरांनीदेखील या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी टिपू सुलतान येथे महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली, शांततेत व उत्साहात मिरवणूक पार पडली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button