प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र वाशिम येथे पीएम विश्वकर्मा वर्षपूर्ती कार्यक्रम संपन्न….

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : – प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र वाशिम येथे पीएम विश्वकर्मा वर्षपूर्ती कार्यक्रमाचे 20 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा लाईव्ह दाखवण्यात आला आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते विविध ट्रेड चे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना, योजनेचे आयडी कार्ड, प्रमाणपत्र, लोन संक्शन लेटर, वाटप करून गौरवण्यात आले, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन बोतिकर( जिल्हा ग्राम उद्योगधिकारी) सर, प्रमुख उपस्थित लोखंडे सर (खादी ग्रामोद्योग वाशीम)
यश विरकर(एल डी एम ) आकाश महुळे ( शिल्प निर्देशक ) खांबयत सर (महा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र)
कपिल सारडा (भा ज पा लोकप्रतिनिधी )
अमोल महाले सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र मार्फत
पीएम विश्वकर्मा योजनेचे वर्षपूर्ती सोहळा कार्यक्रम पार पाडण्यात आले कार्यक्रमाचे संचालन मार्गदर्शन समाधान भगत, गजानन सर, यांच्याकडून करण्यात आले व तसेच सामाजिक कार्यकर्ते जावेद धनु भवानीवाले यांनी पि एम विश्वकर्मा योजनेबद्दल मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.



