Uncategorized

आमदार आकाश फुंडकर यांची तत्परता: मदतीसाठी सज्ज नेतृत्व

पोलीस प्रशासनाचे कौतुकास्पद सहकार्य

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

*खामगाव शहरात दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचा उत्सव अतिशय भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही शहरात मिरवणुकीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, दुपारी ४.३० वाजता अमडापूर ते चिखली मार्गावर एक दुर्दैवी अपघात घडला. अकोला येथील *न्यू भारत बँड पार्टी* यांच्या गाडीला अमडापूरपासून काही किलोमीटर अंतरावर टायर फुटल्याने मोठा अपघात झाला.

खामगाव शहरातील विसर्जन मिरवणूक शांत आणि सुरक्षित पार पडावी यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरून मिरवणुकीच्या नियोजनामध्ये सक्रिय मार्गदर्शन करत होते. एव्हढ्या व्यस्ततेतून आमदार आकाश फुंडकर यांना या घटनेची माहिती मिळताच, , या अपघाताच्या गंभीरतेची जाणीव होताच, त्यांनी तात्काळ मदतकार्य घटनास्थळी पोहोचवण्यासाठी आवश्यक पावले उचलली. त्यांनी तातडीने मदत करण्याचे आदेश दिले.

आमदार फुंडकर यांच्या सूचनेनुसार बुलढाणा पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधून मदतकार्य सुरू करण्यात आले. केवळ १५ मिनिटांच्या आत अमडापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, पण पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर मदत मिळाली आणि औषधोपचार त्वरित सुरू झाले.

आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे नियोजन जितके उत्तम होते, तितकेच त्यांनी अपघाताच्या घटनेत मदत पोहोचवण्यात दाखवलेली तत्परता आदर्श ठरली. त्यांच्या या कार्यकुशलतेमुळे शहरातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button