Uncategorized

२९ जून ला होणार तेल्हारा शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि. २८ ; इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ८० % पेक्षा जास्त गुण प्राप्त असणारे गुणवंत विद्यार्थी तसेच NEET व JEE मधील गुणवंत विद्यार्थी यांचा भव्य गुणगौरव , सत्कार सोहळा तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याकरता मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. २९ जुन २०२४ रोजी दुपारी १२:३० ला माहेश्वरी भवन तेल्हारा येथे आयोजित केला आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी तेल्हारा शहर व श्री महेश दादा गणगणे मित्रपरिवार यांच्यातर्फे तेल्हारा शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा हा भव्य गुणगौरव व सत्कार सोहळा असून या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून स्मिता पाटील म्हसाये सहा.पोलीस निरीक्षक, कुणाल प्रमोद डिवरे भारत डिफेन्स अकॅडमी अकोला मोटिवेशनल स्पीकर एज्युकेशन कौन्सलर, नीलकांत घुमारे सहा. आयुक्त गुप्तवार्ता वाशिम जिल्हा , संजय वडतकर सर सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर व्यावसायिक मार्गदर्शक पुणे,
जयाताई भारती इंगोले मॅडम विदर्भातील पहिल्या महिला व्हिडिओ जॉकी व नेक्सस कार्पोरेट ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका यांची उपस्थित असणार आहे. कार्यंक्रमाला महेश दादा गणगणे , काँगेस पक्षाचे तालुक्यातील सर्व जेष्ठ पदाधिकारी,तेल्हारा शहर काँग्रेस चे सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक व नेते मंडळी तसेच महेश दादा मित्र परिवारातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील . या आयोजित कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यासह उपस्थित रहावे असे आवाहन तेल्हारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button