३० जून पासून सर्वात सुंदर वलयांकित असलेला शनीग्रह होतोय वक्री! ,जाणून घ्या शनी ग्रहाची वक्रगती व साडेसाती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
अकोला दि. २८ : खगोल प्रेमींसाठी खगोल क्षेत्रातली हि महत्वाची घटना आहे. प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरल्याने सूर्य आकाशात पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकल्याचा भास आपणास होत असतो.
असाच काहीसा प्रकार ग्रहांचे बाबतीत घडून येतो
त्याला आपण ग्रहाचे वक्री होणे, स्तंभित होणे किंवा मार्गी होणे असे म्हणतो. येत्या ३० जून पासून सूर्यमालेतील सर्वात सुंदर व वलयांकित असलेला शनी ग्रह वक्री होत आहे. अशावेळी नेहमी पूर्वेला प्रवास करणाऱ्या ग्रहाची चाल पश्चिमेस होत असल्याचे दिसून येते परंतु ग्रहांची परिभ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने सूर्य आणि ग्रह यामधील अंतर कमी अधिक होते. हे अंतर अधिक असतांना ग्रहगती कमी तर कमी असताना ग्रहगती अधिक असते. पृथ्वी, सूर्य आणि संबंधित ग्रह यांची बदलती स्थिती कारणीभूत ठरते.
सद्य स्थितीत शनी ग्रह कुंभ राशीत २५ व्या अंशावर
असुन ही स्थिती १६ नोव्हेंबरला याच राशीत १८ व्या अंशावर असेल. याचा अर्थ शनी ग्रह पुढील १४० दिवस मागे जात असल्याचे दिसेल. पुढे ही चाल बदलत २९ मार्चला हा ग्रह मीन राशीत प्रवेश करेल.
सूर्याभोवती फिरतांना ग्रहाचे अंतराच्या प्रमाणात परिभ्रमण कालावधीत फरक पडतो. जसे पृथ्वी एका वर्षात सूर्य प्रदक्षिणा पूर्ण करते, तर दूर असलेला शनी ग्रह हा सुमारे साडे एकोणतीस वर्षे लावतो. याचा अर्थ शनी ग्रह सुमारे अडीच वर्षे एका राशीत असतो. याप्रमाणे ज्या राशीत शनी आहे तिच्या मागील व पुढील राशीत अडिच वर्षे सुरूवात, पोटी व शेवटी पायाशी अशी साडेसात वर्षाची साडेसाती मानतात.
प्रत्यक्षात आकाशातील ग्रह आपल्यासाठी उपकारक असुन आपल्या पृथ्वी रक्षणार्थ सहायक आहेत.
आपणही गैरसमज दूर करून आकाशाशी नाते अधिक दृढ करुन त्यांना अधिक जवळ करण्याचे आवाहन खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी केले आहे.



