Uncategorized

डॉ केतकी ताई पाटील यांनी कुटुंबासमवेतखासदार रक्षा खडसे यांना दिल्यात शुभेच्छा

जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा रविवार दिनांक ९ जून रोजी सायंकाळी दिल्ली येथे पार पडला. या सोहळ्यासाठी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांच्यासह कुटुंबियांना निमंत्रण प्राप्त झाले होते. या सोहळ्यासाठी डॉ केतकी पाटील ह्या वडील माजी खासदार डॉ उल्हास पाटील, आई डॉ वर्षा पाटील यांच्यासह दिल्लीत गेल्या होत्या.

त्या प्रसंगी रावेर मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षाताई खडसे यांना मंत्रिपद मिळाल्याचे जाहीर होताच दिल्ली येथे माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशन अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, गोदावरी फाऊंडेशन सचिव डॉ वर्षा पाटील आणि भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी शुभेच्छांचा स्वीकार करून खासदार रक्षा खडसे यांनी आनंद व्यक्त केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button