Uncategorized
दोन दुकाने फोडून गल्ल्यातील कॅश लंपास(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

आठवडी बाजारातील सागर गजानन हुसे यांच्या न्यु सागर हार्डवेअर दुकानाच्या गल्ल्यातून अज्ञात चोरट्याने काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दुकान फोडून गल्ल्यातील तीन हजार रूपये लंपास केले. हुसे यांनी त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रेकॉर्डीग तपासली असता त्यामध्ये घटनेचे फुटेज आढळून आले.
तसेच अब्दुल हमीद चौकातील गोटी हार्डवेअर हे दुकान फोडून त्या दुकानातील गल्ल्यातूनही चोरट्याने ५ हजार रूपये लंपास केले. याप्रकरणी हुसे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरूध्द कलम ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून घटना तपासात घेतली आहे.



