सोयाबिन शेतमालाच्या थेट खरेदीस प्रारंभ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर
शेगांव कृषी उत्पन्न बाजार समीती, शेगांव येथे आज पासुन सोयाबीन शेतमालाची थेट खरेदी स्व. गजाननदादा पाटील नविन मार्केट यार्ड, खामगांव रोड, येथे सुरु झाली आहे.
सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, शुक्रवार दि. २० ऑक्टोंबर २०२३ | पासुन कृउबास शेगांव मार्फत सोयाबीन या शेतमालाची शेतक-यांकडुन जाहीर लिलावाने थेट खरेदी सुरु करण्यात आलेली आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपला सोयाबीन हा शेतमाल समीतीचे नविन मार्केट यार्ड | येथील भव्य प्रांगणावर सकाळी ठिक ११.०० वाजेपर्यंत विक्रीस आणावा व या सुवर्ण संधीचा
सर्व शेतकरी लोकांनी लाभ घ्यावा असे बाजार समीती प्रशासनाव्दारे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
विक्री केलेल्या मालाची रक्कम शेतक-यास त्वरीत मोजमाप झाल्यानंतर अदा करण्यात येईल., मार्केट यार्डवर सोयाबीनची चाळणी होणार नाही., मार्केट यार्डात माल विक्रीस आणण्यापुर्वी
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चाळणी करुन, स्वच्छ करुन काडी-कचरा विरहीत वाळवून व सुकवुन आणावा. असे आवाहन सचिव विलास गु. पुंडकर, सभापती गोपाळराव वा. मिरगे व समस्त् संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समीती, शेगांव यांनी केले आहे.



