Uncategorizedमहाराष्ट्रसामाजिक

वरखेड बु. गट ग्रामपंचायत निवडणुकीत सररपंच सौ. शीतलताई भांगे विज

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव : तालुक्यातील वरखेड बु.
टाकळी गट ग्रामपंचायतचे सरपंच पद रिक्त असल्याने सरपंचपदासाठी निवड प्रक्रिया १८ ऑक्टोबर रोजी निवडणूक पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत सौ. शीतल अमोल भांगे यांना पाच तर त्यांच्या विरुद्ध असलेल्या सौ. रुपाली गोपाल कराळे यांना दोन मते मिळाल्याने सौ. शीतल भांगे सरपंच पदी विजयी झाल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी वरखेड बु. ग्राम पंचायतच्या विजया गणेश कराळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सदर पद रिक्त झाले होते. यामुळे निवडणुक विभागाने सरपंच पदासाठी निवड कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार १८ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकारी आर. आर. मुंढे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतमध्ये निवडणूक पार पडली. यावेळी ९ पैकी ८ सदस्य हजर होते. यातील एक मत अवैध ठरले. निवडणूक साठी सहाय्यक म्हणून तलाठी हाके, ग्रामसेवक अनिल बिचकुले यांनी काम पाहिले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button