महाराष्ट्रसामाजिक

मलकापूर तालुक्यातील अपघात सानुग्रह मंजुर


  • स्टार‌ भारत लाईव‌ एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

:- स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुगृह अनुदान योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू पावलेल्या मलकापूर तालुक्यातील ३ शेतकऱ्यांच्या वारसास आर्थिक सहाय्य म्हणून दोन लाख रुपयांचा धनादेश आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सलमाबी गुलाब खान पठाण रा. उमाळी, संतोष अशोक खाचणे या. दुधलगाव खु.व गणेश शंकर पाटील रा.दाताळा या तीन शेतकऱ्यांचा यावर्षी अपघाती मृत्यू झाला होता. या अपघाती मृत्यू प्रकरणी मृत्यूप्रकरणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. आमदार राजेश एकडे यांनी या प्रस्तावांचा पाठपुरावा केला असता शासन स्तरावरून सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तर आज २० ऑक्टोंबर उपरोक्त उपरोक्त तिन्ही अपघाती मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसास आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते प्रति वारस दोन लाख रुपये याप्रमाणे सहा लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी सूर्यवंशी, काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, बाजार समितीचे संचालक प्रवीण पाटील, अनिल भारंबे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button