क्राईमजळगावा जिल्हा

अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या गाडीवर फायरिंग बोदवड पोलीस स्टेश नमध्ये गुन्हा दाखल

बोदवड प्रतिनिधी

सविस्तर वृत्त असे की काल दि. पाच रोजी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी शिरसाळा मारुती या ठिकाणाहून प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली होती त्या परिसरातील गावांमध्ये प्रचार आटवून बोदवड अमर डेरी जवळ त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून त्यांचा ताफा हा राजुर गावाकडे गावाजवळ सुमारे २:३५ च्या सुमारास पोहोचला असता नांदगाव रोड कडून सुमारे दहा ते पंधरा फूट अंतरावर विना क्रमांकाची एक मोटार सायकल त्यावर दोन व्यक्ती बसलेले होते एक लाल कलरचा टी-शर्ट घातलेला व्यक्ती हा उभा होता गाडी समोर बघताच त्याने आपल्या हातातील काळ्या रंगाच पिस्टल काढून त्यांच्या गाडीच्या दिशेने समोरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोन गोळ्या फायर केल्या परंतु त्यांचा चालक नामे अजय राजू बंगाळे यांच्या लक्षात येता बरोबर त्याने गाडी ही बाजूला वळवली आणि या हल्ल्यामध्ये ते थोडक्यात बचावले एवढ्या धावपळीत मोटरसायकलवर बसून आलेले तिघही आरोपी नांदगाव गावाकडे येणारा शेत रस्त्याने पण काढत असताना त्यामागे यांच्या ताफ्यातील काही वाहनांनी पाठलाग केला परंतु आरोपी पसार झाले होते त्यांनी तात्काळ बोदवड पोलीस स्टेशन गाठून आरोपीं विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 2023, 109, 61, (2 ), 3 (5) शस्त्र अधिनियम 1959,3, 25, 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button