महाराष्ट्र

बुलढाण्यात स्कुटी वाहन चालकांकडून वीस लाख रुपयांची रोकड जप्त!

बुलढाणा प्रतिनिधी

शहरातील कारंजा चौकामध्ये एका जणाकडून २० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाकाबंदीदरम्यान बुलडाणा शहर पोलिसांनी एका स्कुटी चालकाची तपासणी केली. त्याच्याकडे २० लाख मोठी रक्कम मिळून आली.
स्कुटी चालक आणि रोख रक्कम बुलडाणा पोलिसांनी ताब्यात घेतले. पकडल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव जितेंद्र कोचर असून तो अडत व्यापारी असल्याचे समजते. २० लाख रुपयांची कॅश घेऊन आपण चिखली येथे व्यापाऱ्याकडे जात होतो, अशी कबुली कोचर यांनी दिली आहे. दरम्यान, २० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची वाहतूक करण्यास मनाई असल्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी सांगितले. हे प्रकरण निवडणूक विभागाच्या एसएसटी पथकाकडे सोपवण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button