निधनबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे माजी प्रमुख स्व. दयाराम आढाव (पाटील) यांचे निधन

प्रसिद्ध किर्तनकार ‘ह.भ.प. दयाराम महाराज’ काळाच्या पडद्याआड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर येथील धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व स्व. दयाराम किसन आढाव (पाटील) (वय 73) यांचे दि. 25 मे 2026 सोमवार रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते मुळचे रा. पिंपळखुटा ता. नांदुरा येथील असून हल्ली तहसील रोड समोर, झांबरेवाडा, सरस्वतीनगर, मुक्ताईनगर येथे वास्तव्यास होते.

स्व. दयाराम आढाव यांनी 1975 ते 1993 या कालावधीत श्रीक्षेत्र कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर समाधी स्थळाचे व्यवस्थापक म्हणून उल्लेखनीय कार्य केले. याच काळात त्यांनी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळत धार्मिक परंपरेच्या जतनासाठी मोलाचे योगदान दिले होते.

धार्मिक क्षेत्रात त्यांची ओळख प्रसिद्ध किर्तनकार तसेच “ह.भ.प. दयाराम महाराज” म्हणून होती. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधन, अध्यात्म आणि संस्कारांचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या निधनाने धार्मिक व वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे.

ते “माझी माऊली” चॅनलचे गणेश आढाव (पाटील) यांचे वडील होत.

आई मुक्ताई त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button